Kamesh Ghadi

5th March 2024
5th March 2024

भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी प्रश्नावली

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने घटनेबद्दल प्रश्नोत्तरांरुपी अनन्यसाधारण माहिती आम्ही पोहोचवत आहोत. भारतीय संविधानाची मुख ओळख लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत व्हायला हवी, या उद्देशाने जास्तीत जास्त वाचकांना खालील प्रश्नावली पाठवावी. व आपणही काळजीपूर्वक वाचावी.

१)अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?
कलम १७

२)संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३)संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?
१२ परिशिष्टे

४)संविधानात एकूण कलमे किती ?
मूळ ३९५ कलमे (सध्यस्थितीत ४४८)

५)घटनेनुसार संघराज्याची अधिकृत भाषा कोणती?
हिंदी {इंग्रजीचाही वापर होऊ शकतो} (हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे.)

६)संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
२ वर्ष ११ महिने १८ दिवस

७)भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणत्या कलमाच्या अधिकारात येते?
कलम १९ ते २२

८)नवीन राज्यांची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत येते?
कलम २

९)कोणत्या कलमांतर्गत समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे?
कलम ४६

१०)संविधानात कोणाचे हस्तलेखन आहे?
बिहारी नारायण रायजादा (कॅलिग्राफी पद्धत), संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले.

११)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अधिकाराचे वर्णन ‘संविधानाचे हृदय आणि आत्मा’ असे केले होते?
घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

१२)संविधान सभेची प्रथम बैठक केव्हा पार पडली?
९ डिसेंबर १९४६

१३)संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात?
मूलभूत कर्तव्य

१४) १. भारतीय संविधानाने कोणते मूल्य स्वीकारले आहे?
धर्मनिरपेक्षतेचे

१५)घटनेनुसार निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते?
निवडणूक आयोग

१६)संघशासनाला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?
कायदा आणि सुव्यवस्था

१७)संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला काय म्हणतात?
संघसूची

१८) ‘शोषणाविरुद्धचा हक्क’ या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबींवर बंदी घातली आहे?
माणसांची खरेदी-विक्री, गुलामगिरी व वेठबिगारी, कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी मुलामुलींना कामावर ठेवणे.

१९)मूलभूत अधिकारांचे रक्षक (fundamental rights protector) कोणाला म्हंटले जाते?
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय

२०)भारतीय संविधान संपूर्ण ताकदीने केव्हा लागू झाले?
२६ जानेवारी १९५०

२१)कोणत्या कलमान्वये ६ ते १४ वर्षांपर्यंत मुलांना प्राथ. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली? (right to education)
कलम २१

२२)सत्तेचे भारतात कोणत्या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे?
कार्यकारी (प्रशासकीय), कायदेकारी (विधिमंडळे), न्यायालयीन

२३)न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च अधिकार कोणाकडे असतात?
सर्वोच्च न्यायालय

२४)आणीबाणीचे कोणते तीन प्रकार आहेत?
राष्ट्रीय आणीबाणी, प्रादेशिक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी (३५८व्या कलमानुसार कलम १९ मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात.)

२५)भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोणास म्हंटले जाते?
राष्ट्रपती

२६) संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? (Fundamental duties)
११

२७)भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण? (Supreme commander)
राष्ट्रपती

२८)लोकसभेची व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती?
५५२, २५०

२९)लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळेचे अंतर किती असावे?
६ महिने

३०)राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
राज्यपाल

३१)भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषड अस्तित्वात आहे?
६ (सध्या प.बंगाल मध्येही)

३२)विधानसभेचे वर्षातून कमीतकमी किती अधिवेशन होणे गरजेचे आहे?
२ अधिवेशने

३३)सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? व एकूण संख्या किती आहे?
राष्ट्रपती करतात, एकूण संख्या ३४

३४)मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
लोकसभेला

३५)कोणत्या कलमांतर्गत बालमजुरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण मिळाले आहे?
कलम २३ व कलम २४

३६)अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाले?
कलम २९ व कलम ३०

३७)मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीला कलम ३२ अन्वये कुठे तक्रार करता येते?
थेट सर्वोच्च न्यायालयात

३८)अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन कोणत्या कलमांतर्गत करण्यात आले आहे?
कलम ४६

३९)भारतीय संविधान लागू करण्यापूर्वी संविधान सभेच्या किती बैठका झाल्या?
११ सत्रे (बैठका)

४०) राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण किती वाचने झाली?
तीन
• प्रथम वाचन (४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
• दुसरे वाचन (१५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९)
• तिसरे वाचन (१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)

४१)कितव्या वयानंतर सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे?
सुरुवातीला २१ वर्षे, परंतु १९८९ साली झालेल्या ६१ व्या घटनादुरुस्तीनंतर १८ वर्षे

४२)संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता?
सार्वाभोम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य

४३)कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?
समानतेचा हक्क

४४)भारतीय संविधानानुसार कोणत्या अधिकारांवर निर्बंध टाकता येत नाही? किंवा उल्लंघनही करता येत नाही?
मूलभूत अधिकार

४५)सध्यस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नाव काय आहे?
नागरी संरक्षण अधिनियम

४६)राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत झाली?
कलम ५२, कलम ६३

४७)कलम ७८ नुसार राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे कोणाचे कर्तव्य आहे?
प्रधानमंत्री यांचे

४८) राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे?
कलम १२३

४९)भारतीय संविधानाचे नागरिकांप्रती मुख्य उद्दीष्ट काय?
न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता

५०)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कारण संविधान बनवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने, जोमाने व प्रभावीपणे जोपासले.

जय भिम…..जय संविधान

Share this Post (शेअर करा)
Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

More Update Follow Me On  Social Media

Recent Post