Kamesh Ghadi

1st March 2024
1st March 2024
हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा

१) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.
लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय.? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.
मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं.

२) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.

३) तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूप बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.

४) चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, क्रांतिकारक इ.) वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव.

५) पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने हे लोक काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीची बदनामी ते आजपासून सुरु करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे.?

हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरु ठेवतात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.

तेव्हा मित्रांनो, हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल.

शिक्षण घेऊन विचारी व्हा… वैज्ञानिक व खरा दृष्टिकोन स्वीकारून खोटा राष्ट्रवाद, देवाधर्माच्या नावाखाली, इतिहासाच्या नावाने खोटं बोलणाऱ्यांना थारा देऊ नका…

Share this Post (शेअर करा)
Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

More Update Follow Me On  Social Media

Recent Post