रामायण, महाभारत घडलेली ही पवित्र हिंद भुमी परकीय मुघली आक्रमणामुळे पुन्हा अपवित्र झाली. शेतात पिकाला आग लागून सर्वकाही क्षणात भस्म व्हावं त्याप्रमाणे सर्व हिंदूस्थान गुलामगिरीच्या छायेखाली येऊन झाकला गेला. हिंदुस्थानचे अस्तित्व नष्ट होऊन तो फक्त नावापुरताच राहिला.
अधर्माने उच्छाद मांडलेल्या या पवित्र भूमीला कपटी मोघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तारणहार हवा होता आणि तो अवतार म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’. गुलामगिरीत अडकून पडलेल्या हिंदूस्थानातील जनतेला पुन्हा जागे करून स्वतःच स्वराज्य उभे करण्यासाठी इ.स. १६३० मध्ये जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले आणि पुढे जे घडले ते या हिंदूस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले .
शिवाजी महाराजांच्या कार्याचा लौकिक आज ३५० वर्षे होऊनही तसाच अबाधित आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी म्हटले जाते की, ‘शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरात’,अस का बरं ? त्यांनी जन्माला यावं अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून? की त्यांचे मावळे म्हणून आपण असमर्थ आहोत म्हणून ?
या हिंदूस्थानात आपण स्वातंत्र्यात जगतोय ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमुळेच. खरतर महाराजांचे पुतळ्यांची उंची वाढवण्यापेक्षा त्यांचे विचार, कार्य वाढवले तर त्यांना जास्त आनंद होईल. वैयक्तिक आयुष्य जगण्याबरोबरच आपण निश्चयाने काही वेळ आपल्या देशासाठी, धर्मासाठी दिला तर महाराजांना पुन्हा अवतार घेण्याची गरजच भासणार नाही, नाही का? हि भूमी, हे राज्य, हा देश आपला आहे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
• (टिप: हा पहिला भाग आहे, एकूण आठ भागांपैकी पुढील भाग दुसऱ्या लेखात दिला जाईल)
• लेखक: विराज विजय करकरे, चिपळूण,
• 7083878928